Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम

पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम
मुंबई , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (17:50 IST)
इंदर भटिजा हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानीची जन्मठेप मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. 24 वर्षांपूर्वीवी इंदर भटिजा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होत‍ी.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानीची पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 

कल्याण सेशन कोर्टाने 2013 मध्ये पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात कलानीने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने कल्याण सेशन कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे.

दरम्यान, 1990 मध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर सायंकाळी पिंटो पार्क रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या घनश्याम भटिजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटिजा यांनी करत आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र 28 एप्रिल 1990 रोजी सकाळी इंदर कामावर जात असताना अंगरक्षकाचीच त्याची गोळ्या घालून हत्या केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi