Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकचा नव्हे शांततेचा एजंट

पाकचा नव्हे शांततेचा एजंट
मुंबई , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:36 IST)
मी पाकिस्तानचा एजंट नसून शांततेचा एजंट आहे, अशी प्रतिक्रिया सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. सामनाच्या अग्रलेखातून सुधींद्र कुलकर्णी यांचा उल्लेख पाकिस्तानी एजंट म्हणून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांमधील जनतेमध्ये संवाद घडला तरच संबंध सुधारतील आणि यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहे असे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा मी आदर करतो मात्र, त्यांनीही असा आदर दाखवायला हवा, असेही ते म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi