Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील नरहे आंबेगावमधील इमारत कोसळली

पुण्यातील नरहे आंबेगावमधील इमारत कोसळली
पुणे , शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (12:36 IST)
पुण्यात काम अपुर्णावस्थेत असलेली पाचमजली इमारत कोसळली. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. या इमारतीखाली एक व्यक्ती अडकली असण्याची भीती अग्निशमन दल आणि बचावपथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
ही इमारत नुकतीच बांधण्यात आली होती, मात्र गुरूवारी इमारतील थोडे तडे गेल्याने ती झुकली होती. त्यामुळे काही रहिवासी इमारतीतून बाहेर पडले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तीनच मजल्यांची परवानगी देण्याच आलेली असतानाही पाच मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले अशी माहिती समोर येत आहे. 
 
काम अपुर्णावस्‍थेत असलेल्‍या या ईमारतीमध्ये काही कुटुंब राहत होती. काल या ईमारतीला तडा जाउन ती काहीशी झुकली. त्यामुळे इमारतीत राहणारी कुटुंबं आधीच इमारतीतून बाहेर आली होती. मात्र रात्री 3 वाजताच्या दरम्यान इमारतीच्या खाली लावलेली कार आणण्यासाठी एक युवक पुन्हा इमारतीखाली गेला. मात्र त्याचवेळी संपूर्ण इमारत खाली आल्याने तो इमारतीखाली अडकला असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणनं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi