Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात धरणांमधून पाण्याची गळती!

पुण्यात धरणांमधून पाण्याची गळती!
पुणे , शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (16:19 IST)
पुण्यात टेमघरसह वरसगाव आणि पवना धरणांमधून पाण्याची गळती होत असल्याचा दावा ‘आप’ने केला. धरणांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहण्याची तसेच आंतरराष्ट्रीय निकषांनुसार धरणांची पाहणी करण्याची मागणी ‘आप’चे नेते विजय पांढरे यांनी केली.

टेमघर धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आल्यानंतर, आम आदमी पक्षाने पुण्यातील इतर धरणांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बिल्डर अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला. धरणांच्या गळतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. या धरणांना धोका नसल्याचा दावा स्वीकारता येणार नाही.  कारण या खात्यातील अधिकारी खरी माहिती देत नाहीत, असा माझा अनुभव आहे, असं पांढरे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वातंत्र्यानंतर भाजपाला संघर्ष करावा लागला : मोदी