Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा एकदा सोशल मिडीयाची ताकद दिसली

पुन्हा एकदा सोशल मिडीयाची ताकद दिसली
, बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (10:59 IST)
चेंज  याच्या  वेबसाईटवर ‘ऑनलाईन याचिका’ दाखल करत , स्वतः अपंग असलेल्या डॉ. अलकनंदा वैद्य यांची आपली समस्या मांडली होती. त्या तक्रारीची दखल घाव्यी म्हणून  ट्विटवर मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   तातडीने त्यांच्या समस्येची ट्वीटरवरच दखल घेतली आहे. तर  त्यांची माफी मागत राज्याच्या आरोग्य खात्याला तसे निर्देशही दिले आहेत. तसेच कोणता अधिकारी तुमची दखल घेत नाही तेही मुख्यमंत्र्यांनी विचारले आहे.
 
सविस्तर वृत्त असे कीडॉ. अलकनंदा वैद्य यांचे कमरेपासून खाली अपंग असून आरोग्य  खात्यात नोकरीला आहेत. तर हुशार अधिकारी वर्गाने त्यांची बदली पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावरील बारामती येथे केली होती. त्यामध्ये जर कायदा पाहिला तर अपंग व्यक्तीला राहत्या घरापासून १० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बदली करू नये असा नियम आहे. प्रशासकीय यंत्रणेने आपली विनोदबुद्धी पणाला लावत कुठलीही माणुसकी न दाखविता डॉ. वैद्य यांची बदली थेट बारामतीला केली होती.
 
सहा वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांना मोठी दुखापत झाली आणि त्या अपंग आहेत. तर त्या त्यांचे जीवन  व्हिलचेअरवरचे आयुष्य घालवत असून , डॉ. वैद्य यांनी जिद्दीने पुन्हा सरकारी नोकरी मिळविली आहे. पदरी असलेल्या ११ वर्षीय  मुलीचा सांभाळही त्यांनाच करायचा होता. त्यामुळे नोकरीमुळे त्यांना आनंद झाला खरा, पण तो थोडाच वेळ टिकला होता. डॉ. वैद्य सतत व्हिलचेअरवर असतात. त्यांना बाथरूमला घेऊन जाण्यासाठीही सहायकाची मदत घ्यावी लागते. अशा स्थितीत बदलीच्या गावी एकटीने जाणे म्हणजे दिव्य आणि फार अवघड होते. मात्र  सरकारी खात्याने याबाबत जराही माणुसकी दाखवली नाही आणि वैद्य यांच्या बदलीचे फर्मान काढले होते.
 
याबद्दल त्यानी change.org वर याचिका दाखल केली . तब्बल ९०  हजार लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीटरवर ही गोष्ट शेअर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित खात्याला लगेच आदेश दिले आणि तसे ट्वीटही केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संवादपर्व’ प्रभावी ठरेल- तांबे