Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पैठण येथील संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा

- अजित पवार

पैठण येथील संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा
मुंबई , मंगळवार, 1 फेब्रुवारी 2011 (18:18 IST)
पैठण (जि. औरंगाबाद) येथील संतपीठातील अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

मंत्रालायतील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात संतपीठाबाबत बैठक झाली. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. वनमंत्री पतंगराव कदम, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार संजय वाकचौरे, प्रकाशमहाराज बोधले आदी उपस्थित होते.

संतवाड्:मयाचे शिक्षण देणारे देशातील हे एकमेव संतपीठ असून तीन वर्षांपूर्वी या संतपीठाची स्थापना झाली आहे. सर्वपायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी श्री. पवार यांनी सांगितले की, संतपीठातील अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गाच्या भरती प्रक्रियेबाबत दोन महिन्यांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरवात करावी. तसेच संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू करावी.

श्री. टोपे यांनी सांगितले की, संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना पत्र दिले जाईल. त्यानंतर अभ्यासक्रमाबरोबर आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi