Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोटच्या गोळ्याचा खून करुन महिलेची आत्महत्या

पोटच्या गोळ्याचा खून करुन महिलेची आत्महत्या
पुणे , सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (11:29 IST)
पोटच्या गोळ्याचा खून करुन स्वत: चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या या महिलेने कौटुंबिक भांडणातून हे कृत्य केल्याची शक्यता आहे.
 
दीप्ती तेजस मोरे (वय ३४) या महिलेने आत्महत्या केली आहे. अर्णव (वय ५) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील माणिकबागेतील निखिल गार्डन सोसायटीमध्ये ही घटना घडली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दीप्तीने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. तिने काही दिवसांपूर्वी आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती.
 
तिचा पती तेजस आयटी कंपनीत नोकरीला आहे. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मी अर्णवला मारून टाकले आहे. आता मलाही राहायचे नाही, असे तेजसला सांगून ती घराबाहेर पळून गेली. घराचे बाहेरून दार बंद करत तिने टेरेसवर जाऊन खाली उडी मारली. तिने उडी मारल्याचे समजताच इमारती खाली लोक जमा झाले असतानाच तिचा पती तेजसने आरडा-ओरड करत घराचा दरवाजा उघडण्यासाठी मदत मागितली व त्यांनी फ्लॅटची चावी खाली टाकली़ लोकांनी इमारतीत येऊन त्यांच्या घराचा दरवाजा उघडला आणि सर्वांनाच दुसरा धक्कादायक प्रकार समोर पहावयास मिळाला तो म्हणजे याच घरात अर्नव या त्यांच्या पाच वर्षांचे मुलाचे हाताची नस कापुन व त्याचा गळा आवळून खून झाल्याचे समोर दिसले.

Share this Story:

Follow Webdunia marathi