Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलीसांवर दगडफेक; आमदार कदम यांना अटक

पोलीसांवर दगडफेक; आमदार कदम यांना अटक
मोहोळ , सोमवार, 6 जुलै 2015 (10:42 IST)
शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अटक करवून घेण्यासाठी मोर्चा घेऊन गेल्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ५७ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पंढरपूरकडे हायवे पुलाखाली वाहतुकीस अडथळा ठरणारी लोखंडी जाळी कदम यांनी काढून टाकली होती. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़  मात्र, हा गुन्हा खोटा असल्याची तक्रार करीत कदम यांनी या गुन्ह्यात अटक करवून घेण्यासाठी मोर्चा काढला़ यावेळी दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले़ पोलीस गाड्याच्याही काचा फोडण्यात आल्या़  शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि दगडफेक या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi