Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रशासनाच्या निर्णया विरोधात तुळजापूर बंद

प्रशासनाच्या निर्णया विरोधात तुळजापूर बंद

वेबदुनिया

तुळजापूर , सोमवार, 30 नोव्हेंबर 2009 (19:53 IST)
MH News
MHNEWS
तुळजापूरच्या भवानी मंदिरात अभिषेक बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर चिडलेल्या पुजाऱ्यांनी तुळजापूर बंदचे आवाहन केले असून, या नंतर शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे.

अभिषेकामुळे तुळजापूरच्या देवीच्या मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्त्व विभागाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याचा आधार घेत प्रशासनाने मंदिरातील अभिषेक बंद करण्याचे आदेश काढले आहेत.

पुजाऱ्यांच्या बंदमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होत असून, हॉटेल, गाड्या, सर्व व्यवहार ठप्प आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi