Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रा सदानंद मोरे आणि प्रा शेषराव मोरे ह्यांची प्रकट मुलाखत

प्रा सदानंद मोरे आणि प्रा शेषराव मोरे ह्यांची प्रकट मुलाखत
, सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (12:49 IST)
भाषाप्रभू पु भा भावे स्मृती समितीच्या वतीने येत्या १३ ऑगस्टला रात्रौ आठ वाजता शिवाजी मंदिर ,दादर, मुंबई येथे घुमान मुक्कामी अलीकडे भरलेल्या ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा सदानंद मोरे आणि अंदमान येथे लवकरच भरणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा शेषराव मोरे ह्या दोन दिग्गज लेखक-विचारवंतांच्या एकत्रित प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . " भारताची सार्वभौमता, एकात्मता आणि नागरिकांनी पाळावयाची कर्तव्ये " हा विषय असून मुलाखत घेण्याचे काम अधिवक्ता किशोर जावळे, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि पत्रकार स्वानंद ओंक करणार आहेत . आघाडीचे लघुकथाकार,कादंबरीकार आणि विचारवंत पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त भूषविणार आहेत . हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे कार्यवाह अरविंद विठ्ठल कुळकर्णी ह्यांनी कळविले आहे . भावे समिती गेली ३५ वर्षे विविध उपक्रमाद्वारे समाजप्रबोधनाचे काम कष्टाने आणि निष्ठेने करीत आहे .

Share this Story:

Follow Webdunia marathi