Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियसीच्या चिमुकल्याला लोकलखाली फेकले

प्रियसीच्या चिमुकल्याला लोकलखाली फेकले
मुंबई , गुरूवार, 29 जानेवारी 2015 (11:48 IST)
प्रियकराने आपल्या प्रियसीच्या चार वर्षांच्या मुलाला लोकलखाली फेकल्याची घटना मालाड येथे घडली. प्रेयसी तिच्या मित्रांशी बोलत असल्याने प्रियकराने हे कृत्य केले. या घटनेत चिमुकल्याला एक हात गमवावा लागला 
आहे. 
 
संदीप सहदेव बेहरे असे आरोपीचे नाव असून, तो खार येथे राहत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली. ती मालाड येथे आपल्या मुलासमवेत रहाते. संदीपशी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ती आपल्या मित्रांशी गप्पा मारीत असे, हे संदीपला आवडत नसे. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संदीपने तिच्या मुलाला लोकलखाली फेकले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi