Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रीमध्ये वडापाव न दिल्याबद्दल, शिवसेना नेत्याने दुकानदाराला केले मारहाण

फ्रीमध्ये वडापाव न दिल्याबद्दल, शिवसेना नेत्याने दुकानदाराला केले मारहाण
मुंबई , मंगळवार, 1 मार्च 2016 (16:29 IST)
एका घटनाक्रमात शिवसेनेच्या एका नेत्याने दुकानदाराने फ्री वडापाव न दिल्याबद्दल त्याला मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आणि पोलिसाने प्रकरणाची नोंद केली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी शहराच्या विलेपार्ले भागात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर एका क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान तेथे उपस्थित आयोजन समितीचे सदस्य सुनील महाडिक यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना दुकानातून फोकटमध्ये 100 वडापाव आणायला सांगितले.   
 
दुकानदाराने फ्रीमध्ये वडापाव देण्यास मना केले. या गोष्टीवर नाराज सुनील महाडिक आपल्या साथीदारांसोबत दुकानात आले आणि दुकानदाराला धमकावले.  
 
दोघांमध्ये बाचाबाची झाली, प्रकरण एवढे वाढले की सुनीलने काठीने दुकानदाराची पिटाई केली.
 
 
ही घटना दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर सोमवारी दोषी नेत्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला अटक करण्यात आले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi