Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्पांच्या विसर्जनाची जय्यत तयारी

बाप्पांच्या विसर्जनाची जय्यत तयारी
पुणे , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (11:27 IST)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आणि दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देत गणेशोत्सव साजरा होत असतानाच गणरायला अत्यंत्य साधेपणाने निरोप देण्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे. देखावे पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत गर्दी होत आहे.
दरम्यान, अनेक मंडळांनी सामुहिक मिरवणुका काढून वाचलेला खर्च दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. विसर्जनासाठी घाटांची स्वच्छता करण्यात आली असून मुठेच्या पात्रात पाणीही सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi