Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्याने 'शीर' कापून पोलिस स्थानकात नेले

बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्याने 'शीर' कापून पोलिस स्थानकात नेले
पुणे , शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (15:05 IST)
चारित्र्यावरील संशयामुळे कु-हाडीने पत्नीचे शीर धडावेगळं करणा-या एका इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. रामू चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो 55 वर्षाचा असून पुण्याच्या गंगा ओशि‍यन सोसायटीमध्ये चौकीदारीचे काम करत आहे. तो पत्नीचे शीर हातात घेऊन रस्त्यावरून चालत जात होता. कात्रज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
 
एका सोसायटीत वॉचमन म्हणून काम करणा-या रामूचा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्याच रागातून त्याने प्रथम पत्नीची हत्या केली आणि कु-हाडीने तिचं शीर धडावेगळं केलं. पच्नीत शीर आणि कु-हाड हातात घेऊन चालणा-या रामूला पाहून रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी हे वृत्त कळताच त्यांनी रामूला अटक करून पोलिस स्थानकात नेले असताना त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi