पुढच्या दसरा मेळाव्या भगवानगडाच्या गादीवर बसलेले महंत मला मुलगी म्हणून बोलवणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मी लेक म्हणून भगवानगडावर येणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवानगडाचं आणि माझा बाप-लेकीचं नातं आहे. वडिलांच्या अस्थी गडावर आणल्या तेव्हाच भगवानगडाची लेक झाले. गडाला बाप मानलं, त्याच्याविरोधात अवाक्षरीह काढणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या .दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गडाच्या पायथ्याखाली घेतलेल्या सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेण टाळलं आहे.महाराष्ट्रातआज सर्वांचे लक्ष पंकजामुंडे यांच्या भाषणाकडे लागले होते. भगवान गडावरून अनेक वाद निर्माण झाले होते.
यंदाचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे गडावर न होता पायथ्याशी झाला.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजीनामा मागणारे माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझा राजीनामा लिहून हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, असं उत्तर यावेळी पंकजांनी दिलं.
महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि राम शिंदे या माझ्या भावांना माझ्यामुळेच लाल दिवा मिळाल्याचा खुलासा पंकजांनी यावेळी केला. इतकंच नाही तर बंधू राम शिंदे कॅबिनेट मंत्री झाले, केवळ मंत्रीच नाही तर माझ्या खात्याचा वारसा त्यांना दिला, असंही पंकजांनी नमूद केल आहे.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– मला उन्हाचे चटके बसत नाहीत, कारण तुमच्या प्रेमाची सावली माझ्यावर आहे
– मी तुमची देवता नाही, माता आहे
– माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे
– माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनामा मागण्यांवर पंकजा मुंडेंची टीका
– हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवून टाका
– तुमच्या हातातला कोयत फक्त ऊसतोडणीसाठी वापरा, दुसऱ्या कामांसाठी नको
– मी मंत्री नंतर, आधी भगवान बाबांची भक्त
– मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे
– मी अहंकार आणि कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले
– पंकजा मुंडेंकडून भगवानबाबांचं दर्शन, मात्र नामदेव शास्त्रींची भेट घेणं पंकजांनी टाळल