Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपा-सेनेचे अखेर ‘हम साथ साथ है’

भाजपा-सेनेचे अखेर ‘हम साथ साथ है’
मुंबई , शनिवार, 29 नोव्हेंबर 2014 (12:55 IST)
रुसवे, फुगवे, कोंडी, चर्चेचे गुर्‍हाळ यातून बाहेर पडत भाजपा आणि शिवसेनेचे ‘हम साथ साथ है’चा नारा दिला असल्याचे संकेत ‘मातोश्री’वर मिळाले आहेत.
 
शिवसेनेच्या सत्तेत सहभागाबद्दल भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी, सुभाष देसाई तसेच उध्दव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असातानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तोडगा निघणार असल्याचे वतव्य केल्याने सेनेच्या अटी भाजपाने मान्य केल्याचे दिसून येत आहे.
 
सध्या राष्टवादीच्या अप्रत्यक्ष पाठींब्यावर सुरु असणार्‍या भाजपा सरकारला सेनेचा ठोस पाठींब्याची आवश्यकता असल्याने सेनेच्या मागण्यांबाबत भाजपही अनुकूल विचार करीत आहे. सेनेनेही एक पाऊल मागे घेण्याचा पवित्रा घेतल्याने युतीची कोंडी आता फुटल्यात जमा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi