Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप नेत्याला फासली काळी शाई

भाजप नेत्याला फासली काळी शाई
मुंबई , सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (11:56 IST)
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केल्याने भाजपाचे नेते सुधींद्र कुलकर्णी  यांच्यावर शाई फेकण्यात आली व कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकार शिवसेनेने केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.
 
कसुरी यांच्या 'नीदर ए हॉक नॉर ए डव: एन इनसाइडर्स एकाउंट ऑफ़ पाकिस्तांस फॉरेन पॉलिसी' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत होत आहे. हा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुधींद्र कुलकर्णी यांनी ट्विटर पार्ट टाकली असून त्यामध्ये त्यांच्या तोंडावर काळी शाई फासल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे.  शिवसैनिकांनी शिवीगाळ करत आपल्यावर शाई फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi