Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदान यंत्रावर चिन्हे नको : अण्णा हजारे

मतदान यंत्रावर चिन्हे नको : अण्णा हजारे
अहमदनगर , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (11:25 IST)
पक्ष किंवा समूहाने निवडणूक लढविणे घटनाबाह्य असून राजकीय पक्षांची मतदान यंत्रावरील चिन्हे रद्द करावी, अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
 
याबाबत हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणताना लोकसभा व इतर निवडणुका लढविताना भारतातील स्वतंत्र नागरिक निवडणूक लढवू शकतो. कोणत्याही समूहाने किंवा पक्षाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे म्हटलेले नाही. त्यामुळे १९५२ पासून देशातील निवडणुका घटनाबाह्य असून राजकीय पक्षांनी लोकशाहीला धोका दिला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाशी चचार्ही केली असून राजकीय पक्षांची चिन्हे कोणत्या कायद्याने आरक्षित केली आहे?, अशी विचारणा केल्यावर ते निरुत्तर झाल्याचा दावा अण्णांनी केला. समूहाने निवडणूक लढविल्याने लोकशाहीच्या पवित्र मंदिरात गुंड व भ्रष्ट लोक काही प्रमाणात शिरले. त्याला काही राजकीय पक्षांनी खतपाणी घातल्याने लोकशाहीचे नुकसान केले आहे, असे अण्णांनी म्हटले आहे. महाविद्यालयातही राजकीय पक्ष आपल्या पक्षांचा वापर करून तरूणांमध्ये वाद पसरवित असल्याचा आरोप अण्णांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi