Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मदन पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

मदन पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
सांगली , शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (11:28 IST)
महापालिकेच्या राजकारणावर सत्ता गाजविणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन विश्वनाथ पाटील (वय ५५) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शोकाकूल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर यकृत बदलाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू झाले. गुरुवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णाकाठी वसंतदादा स्मारकाच्या परिसरात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई श्रीमती लीलाताई, पत्नी जयश्री, विवाहित कन्या सोनिया होळकर-पाटील व मोनिका असा परिवार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi