Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनधरणीसाठी गडकरींकडून उद्धव ठाकरेंची भेट

मनधरणीसाठी गडकरींकडून उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई , सोमवार, 2 मार्च 2015 (13:53 IST)
भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा, यासाठी नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. 
 
भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने विरोध केला आहे. रेल्वे अर्थसंकल्पावरही सेनेने टीका केली. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजले मात्र, सेनेने 
याबाबतची आपली भूमिका रात्री उशिरापर्यंत स्पष्ट केली नाही. गडकरी यांनीही या चर्चेबद्दल मौन पाळले. शरद पवार व ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, त्याप्रमाणे मी ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi