Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे करणार नव्याने बांधणी : राज ठाकरे

मनसे करणार नव्याने बांधणी : राज ठाकरे
पुणे , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:52 IST)
विधानसभा निवडणुकीत आलेल्या पराभवाची सल विसरुन नव्याने पक्षबांधणी करण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी पुण्यात दिले.
 
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछेहाट झाली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची कारणमीमांसा करून नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी राज ठाकरे चार दिवसांच्या पुणे दौर्‍यावर आले आहेत.
 
त्यांनी पुण्यातील  लॉ कॉलेज रस्ता येथील राज महल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही पराभवामागील कारणे स्पष्ट केलीच शिवाय पदाधिकारी व नगरसेवकांच्या कामगिरीचा हिशेब मांडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्या वेळी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व काही नगरसेवक त्यांच्यासोबत उपस्थित होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi