Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठवाड्यात चमत्कार दुष्काळ संपला १६ वर्षांनी पहिल्यांदाच धरण भरले

मराठवाड्यात चमत्कार दुष्काळ संपला १६ वर्षांनी पहिल्यांदाच धरण भरले
, सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (14:48 IST)
पूर्ण देशात गाजलेले आणि प्रथमच भारतात मिरजहून लातूरला पाणी पोहचवण्याचा प्रयोग सगळ्यांनी पाहिला आहे.अनेक वर्षे दुष्काळ भोगलेल्या मराठवाडा अखेर सुखावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या जाल्युक्त शिवार कामांना चांगलेच यश मिळाले आहे.
 
लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील १२ गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा आला आहे. धरण तुडूंब भरले असून धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटीमिटरनी उघडण्यात आली आहेत. २०१० नंतर म्हणजेच १६ वर्षांनी  पहिल्यांदाच धरण भरले असून पाणी सोडणे सुरु झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
नदीकाठावरील गावांमधील सर्व नागरिकांनी व शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-०१ लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. 
 
तावरजा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 
तावरजा मध्यम प्रकल्प प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा (इनफ्लो) असाच राहिला तर येत्या २४ तासात धरण निर्धारीत पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तावरजा नदीमार्गे सोडण्यात येणार आहे. तावरजा नदी काठावरील शेतकरी तसेच नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
आज जलपूजन मांजरा प्रकल्पात उत्तम पाणीसाठा झाल्याने लातूर महानगरपालिकेने धरणावर जलपूजन करण्याचे ठरवले आहे.  महानगरपालिकेचे प्रशासन आणि पदाधिकारी जलपूजन करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयआयटी सोबत इतर ८ उपग्रह इस्रो ने सोडले अवकाशात