Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद : तावडे

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद : तावडे
मुंबई , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (14:44 IST)
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या स्थगिती निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
 
या प्रश्नी सरकारकडून पुढील भूमिका ठरविण्यासाठी  तावडे यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक घेतली. यामध्ये चर्चा झाली असून उच्च न्यायालयाच्या स्थगिती निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. या प्रकरणातील सर्व न्यायालयीन बाजू तपासण्यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi