Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला शेती शिकवू नका : खडसे

मला शेती शिकवू नका : खडसे
, मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (16:32 IST)
मोबाईलचे बिल भरणार्‍या शेतकर्‍यांकडे वीजबिल भरण्यासाठी कसे पैसे नाहीत? या आशयाच्या विधानामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. यावर पुन्हा टीका करताना ज्यांना शेतीतलं काही कळतं नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकर्‍याचाच मुलगा आहे, अशा शब्दात खडसे यांनी समाचार घेतला आहे.
 
शेतकर्‍यांची चेष्टा करणारे खडसे आणि अजित पवार एकच असा टोला उद्धव यांनी लगावला होता. यावर खडसे संतप्त झाले असून पुन्हा ‘वाद’युध्दास प्रारंभ झाला आहे. मी शेतक-यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi