Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागाईविरोधात कॉंग्रे आंदोलन करणार

महागाईविरोधात कॉंग्रे आंदोलन करणार
मुंबई , गुरूवार, 3 जुलै 2014 (11:21 IST)
'अच्छे दिन आने आले है'असे सांगून मते मागणार्‍या मोदी सरकारने लादलेल्या महागाईच्या निषेधार्थ येत्या 6 जुलैपासून कॉंग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रवक्त सचिन सावंत यांनी सां‍गितले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी जनतेला महागाई कमी करण्‍याचे आश्वासन दिले होते. परंतु महागाई कमी करण्यात मोदी सरकार सपशेष अयशस्वी ठरले आहे. मोदींना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. मोदी सरकारने रेल्वेभाडेवाढ केली तसेच  पेट्रोल-डिझेलचेदर वाढवले आहेत. त्यामुळे जनता चांगली होरपळली आहे.

जिल्हा  मुख्यालयांसह तालुका स्तरावर निदर्शने केली जातील. प्रामुख्यांने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध म्हणू कॉंग्रेसचे कार्यकर्ते दुचाकी ढकलत नेणार आहेत.तसेच केंद्र सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर आणला जाईल, अशी माहिती सचिन सावंत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi