Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात बीफ भरलेली व्हॅन पेटवली

महाराष्ट्रात बीफ भरलेली व्हॅन पेटवली
, मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (15:50 IST)
मुंबई- महाराष्ट्रात सुमारे 100 लोकांनी एका व्हॅनमध्ये बीफ असल्याची माहिती मिळाल्यावर ती पेटवून दिली. प्रारंभिक तपासणीनंतर पोलिसांनी स्वीकार केले की त्यात जवळपास 100 किलो बीफ होतं. उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात बीफ पूर्णपणे बॅन आहे.
 
पोलिसांप्रमाणे ही घटना रविवार घडली असून ती व्हॅन अहमदनगरहून औरंगाबादकडे जात होती. औरंगाबादच्या जवळच सावखेडा गावात काही लोकांनी व्हॅन थांबवली. या लोकांची ड्राइव्हरशी वादही झाला. त्यानंतर व्हॅन पेटवण्यात आली. ड्राइव्हरला काही इजा झाली नाही. उल्लेखनीय आहे की सध्या देशात दादरी येथील बीफ हत्याप्रकरणामुळे ताण निर्माण झालेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi