Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलेला शिव्या देणारा मिठ्ठू पोलिसांसमोर चूप

महिलेला शिव्या देणारा मिठ्ठू पोलिसांसमोर चूप
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (12:04 IST)
एका बुजुर्ग महिलेला घाण शिव्या देण्याच्या आरोपात मिठ्ठूला समन पाठवून पोलिस ठाण्यात सादर करण्यात आले. महाराष्ट्रच्या चंद्रपूर जिल्हाच्या राजुरात झालेल्या या घटनेत या पक्षीच्या मालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती, की त्याने मिठ्ठूला शिव्या देणे शिकवले होते.  
 
जनाबाईने आपला सावत्र मुलगा सुरेशावर मिठ्ठूला शिव्या देण्याबद्दल पोलिसात तक्रार नोंदवली होती. महिलेच्या आरोपाची पुष्टी करण्यासाठी पोलिसाने जानाबाई, तिचा सावत्र मुलगा सुरेश आणि मिठ्ठूला ठाण्यात बोलावले. पण मिठ्ठू खाकी वर्दीधारी पोलिसांना बघून घाबरला.  
 
पक्षी जनाबाईला शिव्या देत होता की नाही हे बघण्यासाठी जेव्हा त्याचा पिंजरा महिलेजवळ नेला, त्याने चुप्पी साधली. पोलिस इंस्पेक्टर पीएस डोंगरे यांनी सांगितले, आम्ही मिठ्ठूला फारच सावधगिरीने बघितले पण ठाण्यात त्याने एकही शब्द बोलला नाही. आता मिठ्ठूला वन्य विभाग अधिकार्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi