Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी निवृत्ती घेत आहे - रामदास कदम

मी निवृत्ती घेत आहे - रामदास कदम
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (16:56 IST)
शिवसेना जेष्ठ नेते सध्याचे युतीतील  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर आता पक्ष मोठा करायचा असून  यापुढे केवळ पक्षासाठी काम करणार असल्याचं  पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय आहे. 
 
तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कदम यांचा दावा आहे. तर दुसरीकडे कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभेसाठी इच्छुक असून, मुलासाठी रामदास कदम यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेरेनाचे ग्लँमरस फोटोशूट