Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत रेव्ह पार्टीत दोन आयपीएल खेळाडूंना अटक

मुंबईत रेव्ह पार्टीत दोन आयपीएल खेळाडूंना अटक
मुंबई , सोमवार, 21 मे 2012 (11:28 IST)
मुंबई उपनगरातील जुहू येथे ओकवुड हॉटेलात रेव्ह पार्टीवर छापा टाकून जवळपास १०० जणांना अटक केली आहे. यामध्ये आयपीएल मधील दोन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

PR
PR
लेगस्पिनर राहुल शर्मा आणि वेगवान गोलंदाज वेन पार्नेल यांनाही पकडण्यात आले मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. पार्टीतून ११० ग्रॅम कोकेन आणि चरस जप्त करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले.

५८ मुलं आणि ३८ मुलींना रक्त आणि लघवीच्या चाचणीसाठी कुपर रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. पॉझिटीव्ह निकाल आलेल्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi