Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मुंबईत शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
मुंबई , गुरूवार, 3 एप्रिल 2014 (17:34 IST)
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या कार्यकर्त्यांमध्ये आज ओल्ड कस्टम हाउसमध्ये नामांकन फार्म भरताना लाठीमार झाला. 
         
शिवसेनाचे अरविंद सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आदित्य शिरोडकर आज लोकसभा निवडणूकीसाठी नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली असून लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. लाठीमारात काही लोक जखमी होण्याची शक्यता आहे. हाणामारीत एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.  
          
या घटनेनंतर शिवसेनेचा एक प्रतिनिधि मंडळ पोलिस आयुक्ताला भेटण्यास गेला आहे. शिवसेना प्रमुखाचे पुत्र आदित्य ठाकरेने ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देत म्हटले आहे की पोलिसांनी पक्षपात केला आह.  

Share this Story:

Follow Webdunia marathi