Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत शिवसेना गटप्रमुखाची निर्घृण हत्या

मुंबईत शिवसेना गटप्रमुखाची निर्घृण हत्या
मुंबई , बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (13:05 IST)
मुंबईतील मालाड भागात शिवसेना गटप्रमुखाची अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून निर्घृण हत्या झाली. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. तीक्ष्ण हत्याराने ही हत्या करण्यात आली आहे. 
 
रमेश जाधव असे गटप्रमुखाचे नाव होते. या हत्येच्या पार्श्वभूमीवर खोत डोंगरी तणाव निर्माण झाला आहे. रमेश जाधव खोत डोंगरीत राहत होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी मालाडमध्ये धाव घेतली त्यामुळे रात्रभर तेथे तणाव निर्माण झाला होता.
 
एका महिलेची छेड काढल्यामुळे ही हत्या झाल्याचे दिंडोशी पोलिस ठाण्यातील पोलिसाठी सांगितले. त्याची माहिती मिळाल्यानंतर रमेश जाधव यांनी या लोकांना जाब विचारला होता. त्यानंतर ते लोक तेथून निघून गेले. मात्र, रात्री दहा- साडेदहाच्या सुमारास हल्लेखोरांनी सेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या घरात अचानक शिरले. यानंतर त्यांनी तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने जाधव यांच्यावर सपासप वार केले. रमेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोत डोंगरी भागात तणाव निर्माण झाला होता. 
 
यानंतर, शिवसैनिकांनी दिंडोशी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi