Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुक्ताई चरणी येण्याची तयारी: खडसे

मुक्ताई चरणी येण्याची तयारी: खडसे
जळगाव , बुधवार, 1 जून 2016 (10:57 IST)
कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे,’ असे वक्तव्य महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
 
खडसे हे लालदिवा नसलेल्या अन्य सरकारी वाहनाने मुक्ताईनगरात दाखल झाले. लाल दिव्याच्या वाहनात पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी दुसरे वाहन घेतल्याचे सांगण्यात आले. या वाहनाला क्रमांकही नव्हता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते म्हणाले की, ‘लहानपणापासून पांडुरंगाच्या दिशेने जाणारा हा वारकरी आहे. केले ते जनतेसाठी केले आहे.’  ‘माझा भार वाहण्यासाठी हे वारकरी बसले आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती...! निरविली संती विठोबाची।’ या तुकाराम महाराजांच्या अभगांच्या ओळी सांगत त्यांनी आपणास कुठलीही चिंता नसल्याची टिप्पणी त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिंगवर लिहिली राष्ट्रपतीवर कविता