Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांचा आज पुणे दौरा

मुख्यमंत्र्यांचा आज पुणे दौरा
पुणे , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (16:46 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी पुण्याच्या दोºयावर येत असून ते अधिकाºयांची बैठक घेणार आहेत. येथील प्रलंबित प्रश्नांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला जाणार असून मुख्यमंत्री कोणता ठोस निर्णय घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
पीएमपीएमल, बीडीपी, वाहतुक तसेच पिण्याचे पाणी, नदी, पर्यावरण आदी प्रश्न महत्वाचे आहेत. त्याचबरोबर मेट्रोही दिल्ली दरबारी लटकलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यासाठी रवाना झालेले असून एका खासगी कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर ते अधिकाºयांची बैठक घेणार आहेत. पुण्यानंतर ते पिंपरी-चिंचवड येथेही बैठक घेऊन प्रश्न समजावून घेणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi