Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला पत्रकाराशी भेदभाव

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला पत्रकाराशी भेदभाव
मुंबई , शुक्रवार, 1 मे 2015 (10:58 IST)
महाराष्ट्र सरकारने ‘गोवंश हत्याबंदी’चा कायदा केल्याने, स्वामी नारायण मंदिरातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पहिल्या तीन रांगा पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असूनही एका महिला पत्रकाराला आयोजकांनी जागेवरून उठवून मागे बसण्यास सांगितले. या घटनेचा पत्रकारांसह सर्व स्तरातून निषेध होत आहे.
 
स्वामी नारायण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यावेळी महिला पत्रकार रश्मी पुराणिक या पत्रकारांसाठी राखीव तिसर्‍या रांगेत बसल्या होत्या. मात्र त्यांना तेथून उठून मागे बसण्यास कार्यकत्र्यांनी सांगितले. केवळ महिला असल्याने त्यांना अशा प्रकारची वागणूक देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आयोजकांना सुनावले.

Share this Story:

Follow Webdunia marathi