Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी खडसेंना खडसावले!

मुख्यमंत्र्यांनी खडसेंना खडसावले!
मुंबई , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (10:55 IST)
‘तुम्ही विरोधी पक्षात नाही, याची जाणीव ठेवा’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यासह काही मंत्र्यांना अप्रत्यक्ष खडसावल्याचे वृत्त चांगलेच चर्चिले जात आहे.
 
त्याचे असे झाली की, गुरुवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आघाडी सरकारच्या काळात ‘लाडके’ असणाºया अधिकाºयांची कोंडी करण्याचा प्रयत्न महसूलमंत्री खडसे व काही मंत्र्यांनी केला. जळणारी रोहित्रांच्या प्रश्नावरुन खडसे यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना धारेवर धरले. मी शेतकरी कुटुंबातला आहे. मंत्री असलो तरी रोज शेतीकडे लक्ष असते. तुम्हाला शेतीतले काय कळते, तुमच्याकडून रोहित्रांची दुरुस्ती का होत नाही, असा सवाल करत खडसे यांनी मेहता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
 
यावर हस्तक्षेप करत मुख्यमंत्री फडवणीस यांनी खडसेंनाच रोखत अधिकाºयांची बाजू घेतली. ते म्हणाले, आता तुम्ही विरोधी पक्षात नाही तर सत्ताधारी पक्षात आहात, याची जाणीव ठेवा, अशा पद्धतीने मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही. अजेंड्याबाहेरचे विषय इथे नको.  मंत्रिमंडळाची बैठक शिस्तबद्ध पद्धतीनेच चालली पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना सुनावले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची ही भूमिका व खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत भाजपातील अनेक मंत्र्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi