Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांवरील टीकेमुळे शोभा डे अडचणीत

मुख्यमंत्र्यांवरील टीकेमुळे शोभा डे अडचणीत
मुंबई , गुरूवार, 9 एप्रिल 2015 (11:01 IST)
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’ देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि मराठी पदार्थावर टीका करणार्‍या लेखिका शोभा डे अडचणीत आल्या असून महाराष्ट्रातून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

‘प्राइम टाइम’च्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांना ‘हुकूमशहा’ असे ट्विट करताना ‘आधी गोवंश हत्याबंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको’, असे आणखी एक ट्विट करून डे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली.

त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला.  मात्र, याची कुणकुण लागताच डे यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi