Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युग चांडक हत्या: दोघांना जन्मठेपेसह फाशी

युग चांडक हत्या: दोघांना जन्मठेपेसह फाशी
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (09:50 IST)
नागपूर- उपराजधानीला हादरविणार्‍या युग चांडक अपहरण व खून खटल्यात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने राजेश दवारे आणि अरविंद सिंह या दोघा दोषींना जन्मठेप आणि फाशीचीही शिक्षा सुनावली आहे. सर्व साक्षी-पुरावे व दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 30 जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना दोषी ठरविले होते.
 
युग चांडक अपहरण व हत्येप्रकरणी 8 जानेवारी 2015 रोजी सुनावणीला सुरूवात झाली. सरकारी पक्षाकडून 50 तर, बचावपक्षाकडून 7, अशा एकूण 57 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीने वेग धरला होता. घटनेच्या वर्षभरात खटल्याचा निकाल लागेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी वारंवार रखडली.
 
महत्त्वाचे साक्षी पुरावे
 
120 (ब) कलमान्वये हत्येचा कट, 302 कलमान्वये खून आणि 364 (अ) कलमान्वये अपहरण केल्याचे सिध्द झाले आहे.
 
चांडक यांच्या गुरुवंदना अपार्टमेंटसचा चौकीदार अरुण मेश्रम याच्यासमोरच आरोपी अरविंदने युगला दुचाकीवरून नेले. कोर्टात मेश्रमने पोलिसांच्या बाजूने साक्ष दिली.
 
घटनाक्रम
 
1 सप्टेंबर 2014- युगचे अपहरण आणि हत्या.
2 सप्टेंबर- उशिरा रात्री आरोपींची अपहरण व हत्येची कबुली.
3 सप्टेंबर- युगवर अंत्यसंस्कार.
28 नोव्हेंबर- दोषारोपपत्र सादर.
8 जानेवारी 2015- खटल्याला सुरुवात. पहिल्याच दिवशी युगचे वडील मुकेश यांची साक्ष.
9 फेब्रुवारी 2015- बचावपक्षाने कोर्टावरच घेतला आक्षेप, सुनावणी रखडली.
19 मार्च 2015 पासून सुनावणी पूर्ववत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi