Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवकांनो दुसर्‍या हातात बंदुक घ्या!

युवकांनो दुसर्‍या हातात बंदुक घ्या!
पुणे , सोमवार, 27 एप्रिल 2015 (12:00 IST)
तरूणांनी एका हाताने संगणक चालवावे आणि दुसर्‍या हाताने बंदुक चालवायला शिकले पाहिजे, असा अजब सल्ला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिला आहे. 
 
पुण्यात भारती विद्यापीठाच्या विसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. उत्तम भोईटे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 
माझ्या डोक्यात वेगळाच विचार सुरु आहे, असे सांगताना गोखले म्हणाले, वेगळ्याच तरुणांनी आता केवळ संगणक चालविण्याचे ज्ञान घेणे अपेक्षित नसून त्यांनी दुसर्‍या हाताने बंदुक चालविली पाहिजे. आपण महात्मा गांधीजींच्या देशात राहत असलो तरी आक्रमणाशिवाय काही करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi