Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे महिलेला विवस्त्र होऊन द्यावी लागते अग्निपरीक्षा

येथे महिलेला विवस्त्र होऊन द्यावी लागते अग्निपरीक्षा
नंदुरबार: पतिव्रता असल्याचे सिद्ध करण्यासाठी जात पंचायतीच्या पंचांसमोर नग्नावस्थेत चालण्याच्या राक्षसी प्रथेसह आई पतिव्रता असल्याचे सिद्ध करण्यासाठी लहान मुलांनी गरम कुर्‍हाड हाता घ्यायची, अशी अघोरी प्रथा कंजारभाट समाजात सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
 
नंदुरबारच्या कंजारवाडा भागात एका महिलेला सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रथा पाळण्यासाठी जात पंचांकडून पीडित महिलेला अनेक दिवसांपासून प्रचंड दबाव आणला जात आहे. जात पंचायतीच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून या महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह नाशिक येथील ओझरच्या माहेरचा आश्रय घेतला.
 
मात्र, तेथेही या जात पंचांनी तिला व तिच्या आई-वडिलांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, जात पंचांच्या छळाला कंटाळून तिने अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या पदाधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यानंतर हे गंभीर प्रकरण चव्हाट्यावर आले. 
 
पीडित महिलेला राक्षसी प्रथा लादण्याचा प्रयत्न करणार्‍या जात पंचांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi