Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजच्या मावळ्यांचा 'मनसे'स जय महाराष्ट्र!

राजच्या मावळ्यांचा 'मनसे'स जय महाराष्ट्र!

एएनआय

मुंबई , बुधवार, 6 फेब्रुवारी 2008 (16:58 IST)
राज ठाकरेंच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या' मावळ्यांनी राज्यात नवनिर्माण घडवून आणण्याअगोरच पक्षाची साथ सोडली आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरूद्धच्या टिप्पणीनंतर झडलेल्या वादावर बोलताना ' हा महाराष्ट्रीयन व उत्तर भारतीयांमधील संघर्ष नसून मनसे व समाजवादी पक्षातील वाद असल्याचे शिवसेनेचे चिटणीस विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांविरोधात आघाडी उघडल्यानंतर मुंबईत रविवारी संघर्ष भडकला होता. राज ठाकरे शिवसेनेतून दोन हजार पाचमध्ये बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi