Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरेंशी भेट नाही : उद्धव ठाकरे

राज ठाकरेंशी भेट नाही : उद्धव ठाकरे
मुंबई , सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (11:38 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे वृत्त अफवा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी या भेटीच्या वृत्ताचे खंडन करणारे एक पत्रक काढले आहे. अफवा पसरवून राजकीय पोट भरण्याचा हा धंदा ज्यांनी सुरू केला आहे, तो त्यांनाच लखलाभ होवो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेना हा मजबूत बाण्याचा पक्ष असून गुप्त खलबते करण्यावर आमचा विश्वास नाही, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच निवडणुकांत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi