Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
मुंबई , शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (19:08 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील बोरिवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी ढोबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला. ढोबळे यांच्या संस्थेतील एका महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. परंतु लक्ष्मण ढोबळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.

म‍िळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंबईतील गोराई भागात असलेल्या नालंदा महाविद्यालयाची व्यवस्थापक आहे. ही संस्था राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची आहे. पीडित महिलेवर संस्थेत 80 लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याबाबत महिलेविरोधात पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, संबंधित महिलेने ढोबळे यांनी आपल्यावर तीनवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर अश्लील फोटो सार्वजनिक करून बदनामी करेन अशी धमकी देत असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi