Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विनोद कांबळीवर गुन्हा

विनोद कांबळीवर गुन्हा
मुंबई , सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (13:08 IST)
मोलकरणीला घरात डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी व त्याच्या पत्नीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
सोनी सरसाल ही दोन वर्षांपासून कांबळीच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये घरकाम करीत होती. पोलिसांकडे दिलेल्या फियार्दीत तिने म्हटले आहे, की आठ दिवसांपूर्वी तिने विनोदची पत्नी अ‍ॅड्रियाकडे थकलेल्या पगाराची मागणी केली. मात्र तिने नकार दिला. विनोद कांबळी दिल्लीतून आल्यानंतर तो आणि पत्नीने आपणास मारहाण केल्याचे सोनीने फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण करुन एका खोलीत बंद करून ठेवले होते, पैशांची वारंवार मागणी करूनही पगार न देता घरातून हाकलून दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi