Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विरोधकांच्या ‘कारे’ने वाचणार ‘आरे’?

विरोधकांच्या ‘कारे’ने वाचणार ‘आरे’?
मुंबई , गुरूवार, 26 मार्च 2015 (11:15 IST)
आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडच्या कामास विरोधकांनी जोरदार विरोध केल्याने अखेर राज्य सरकारने हे काम स्थगित केले आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली.
 
या प्रस्तावित कारशेडसाठी २ हजार २०० झाडे तोडावी लागणार होती. हा मुद्दा उपस्थित करुन  राष्ट्रवादीचे प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागले. मुख्यमंत्री म्हणाले, हा कारशेड अन्यत्र हलविण्याबाबत पयार्यांचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. मेट्रोचा मार्ग व डेपोसाठी आवश्यक असलेल्या जागेचा विचार करण्याचे आदेश समितीला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi