Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शहीद संदीपला अखेरचा सलाम

शहीद संदीपला अखेरचा सलाम
जम्मू काश्मीर येथे उरी येथे आतंकवादी सोबत लढताना देशासाठी हुतात्मा झालेले मूळचे सिन्नर येथील जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत रात्री ११.२० वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला लष्कराने अखेर ची मानवंदना दिली आहे. यावेळी जमलेला जनसागर भावुक झाला होता, जड झालेल्या अंतःकरणाने संदीपला निरोप दिला गेला. यावेळी  भारतमाता की जय, शहीद संदीप ठोक अमर रहे, यासह पाकिस्तानच्या निषेधाच्या जोरदार  घोषणा देण्यात आल्या आहे . 
 
संदीप यांचे पार्थिव ओझर विमानतळावरून सिन्नरकडे रवाना झाले ते सुमारे साडेनऊच्या सुमारास येथे पोहोचले होते..
 
येथील स्मशानभूमीत सुमारे दहा हजारावर पेक्षा जास्त नागरिक जमा झाले होते. पार्थिव दाखल झाल्यावर त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते.त्यानंतर आई व वाहिनीने पार्थिवाला पुष्प चक्र अर्पण केले. देश भक्तीवर गीतांचे वादन करत त्यांची अंतिम मिरवणूक काढण्यात आली.रात्री आकाराच्या सुमारास संदीप यांना लष्करातर्फे तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी वातावरण भावपूर्ण झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यामुळे होतो स्मार्टफोन स्लो चार्ज