Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीत लॅन्ड होणार विमाने

शिर्डीत लॅन्ड होणार विमाने
मुंबई , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:48 IST)
श्री क्षेत्र शिर्डी येथे लवकरच विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी १०० कोटींच्या खर्चास मंजुर देण्यात आली आहे. काकडी येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत  करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
 
त्यासाठी १०० कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत. विमानतळाची उभारणी व विकासातील पहिल्या टप्प्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. धावपट्टी  वाढविणे, टर्मिनल क्षमता वाढविणे, टॅक्सी सुविधा, स्क्रीनिंग मशीन इत्यादी सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi