Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवतारे यांनी सरकारला हासडल्या शिव्या

शिवतारे यांनी सरकारला हासडल्या शिव्या
सोलापूर , सोमवार, 22 फेब्रुवारी 2016 (15:00 IST)
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चारा छावण्यांवरुन सरकारला थेट शिव्या हासडल्या. टीका करताना शिवतारे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. सरकारमध्ये असताना असे चुकीचे निर्णय आम्हाला सहन करावे लागतात, अशी खंत  त्यांनी व्यक्त केली.

चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय  कुठल्या …….. घेतला असं म्हणत शिवतारे  यांनी  खालच्या शब्दात टीका केली.

जलयुक्त शिवारमध्ये निवडलेल्या गावांची पाहणी करण्यासाठी शिवतारे सोलापूर दौऱ्यावर आहेत. बार्शी तालुक्यातल्या आगळगावच्या सभेत बोलताना विजय शिवतारेंनी सरकारला अक्षरश: शिव्या हासडल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi