Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर ठाकरे : उद्धव ठाकरे

शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर ठाकरे : उद्धव ठाकरे
मुंबई , शनिवार, 24 जानेवारी 2015 (12:14 IST)
जनतेच्या मागचे दुष्टचक संपावे यासाठी शिवसेनेने सत्तेत जायचा निर्णय घेतला. मात्र सत्तेत गेलो याचा अर्थ आम्ही शेपूट घातली असा कोणी घेऊ नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर होईल असेही ते म्हणाले. स्वातं‍त्र्यवीर वि.दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यकमात उद्धव ठाकरे बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला न्याय मिळतो आहे किंवा नाही हे मी स्वत: दौरा करून पाहणार आहे. सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे मी स्वत: पाहणार असल्याचेही ते म्हणाले.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब यांच्यासारखी माणसे ही आयुष्यभर मशालीसारखी जळत राहिली. समाजासाठीच त्यांनी आयुष्य वेचले. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे झालेच पाहिजे. स्मारक म्हणजे केवळ त्यांचा पुतळा उभारणे असा होत नाही. त्यांचे स्मारक हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसेच असे असायला पाहिजे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi