Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव समारोप समारंभातून भाजपला डावलले

शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव समारोप समारंभातून भाजपला डावलले
मुंबई , शनिवार, 18 जून 2016 (09:36 IST)
येत्या रविवारी शिवसेना पक्षाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असून शिवसेनेने गेली वर्षभर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले आहेत. शिवसेनेने 50 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून रविवारी मुंबईतील गोरेगावमध्ये विशेष जाहीर सभा आयोजित केली आहे. 
 
शिवसेनेचे राज्यभरातील नेते, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आगामी काळात शिवसेनेची ध्येयधोरणे काय असतील याबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा बिगुल वाजवला जाणार असल्यामुळेच शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाला भाजपला निमंत्रण न देण्याचे ठरविले आहे. 25 वर्षे एकमेकांसोबत राहिलेल्या भाजप-शिवसेनेची आगामी काळात मार्ग वेगवेगळेच राहणार हे यातून स्पष्ट होत आहे. शिवसेनाही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवत भाजपला शह देण्याचा उद्धव ठाकरेंनी चंग बांधला आहे. त्यासाठीच शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचा समारंभ जोरात साजरा केला जाणार आहे. येत्या रविवारी गोरेगावमध्ये उद्धव यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेटलींमुळेच काळा पैसा परत आणण्यात अपयश