Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शोभेच्या दारुच्या स्फोटात ८ ठार

शोभेच्या दारुच्या स्फोटात ८ ठार
सांगली , मंगळवार, 5 मे 2015 (10:04 IST)
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे ‘ईगल फायर वर्क्स’ या काराखान्यात शोभेच्या दारूचा प्रचंड स्फोट होऊन ८ जण जागीच ठार झाले तर कवठेएकंदमध्ये फटाक्यांचे कारखाने आहेत. त्याठिकाणी शोभेच्या दारुपासून तयार करण्यात येणारे फटाके प्रसिध्द आहेत. काल सायंकाळी ‘ईगल फायर वर्क्स’मध्ये शोभेच्या दारूचा आऊट तयार करताना प्रचंड मोठा स्फोट झाला.
 
हा स्फोट इतका जबरदस्त होता की याचा आवाज सुमारे १५ मिलामिकटर परिसरात घुमला. अपघातात ८ जण होरपळून जागीच मृत झाले तर चौघे गंभीररित्या भाजले आहेत.  मृतांमध्ये सुनंदा रामचंद्र गिरी (४५) , अनिकेत रामचंद्र गुरव (१६), इंदुबाई तुकाराम गुरव (७०), जुबेदा अकबर नदाफ (५५), राजेंद्र रामचंद्र गिरी (२२), तानाजी ईश्वर शिरतोडे (३२), अजित निशिकांत तोडकर (३२), शरद शिवाजी गुरव (३८), रामचंद्र गिरी (४८) यांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi